...आणि वाघीण चवताळली!
कार्यालयातील काम आवरून घरी पोचायला रात्रीचे 9 वाजले. त्यानंतर जेवणखाणं, जरा फिरणं म्हणजेच शतपावली करून परत घरात येऊन माझ्या खोलीत आलो. 10 वाजत आले होते. चिरंजीव वीरेंद्रच्या शालेय स्पर्धा असल्यामुळे त्याच्या आज झालेल्या अभ्यासाची उजळी घेण्याचे अवघड काम माझ्या नशिबाने आज माझ्याकडे नव्हते. पप्पा गुड नाईट म्हणून तो आपली 2 रीची अभ्यासाची पुस्तके टेबलवर ठेऊन झोपी गेला. सव्वा दहा वाजले. माझी अर्धांगिणी कसलीतरी आकडेमोड करत होती. त्यात व्यत्यय आणण्याचा कसलाही माझा प्रामाणिक हेतू नव्हता. माझाही आज पुस्तक वाचण्याचा मूड नव्हता. डोळ्यावर झोप आपला अंमल गाजवायला पहात होती. पण हिची चूळबूळ त्यात खंड पाडत होती. शेवटी न राहून मी तिला विचारले,
‘झाले का? की रात्रभर बोटे मोजत छताकडे बघत बसणार आहेस?’
‘ओ. झाले. दोनच मिनिटे.’
‘ठीक बाई.’म्हणत मी अंथरूणावर आडवा झालो. तर ती गडबडीने माझ्याजवळ येत मला म्हणाली.
‘ओ. ते नव्हं, तेराशे अधिक दोन हजार किती ओ?’
‘तेहतीसशे. तीन हजार तीनशे. का गं?’
‘मग बरोबर आहे. येवढा खर्च झाला बघा.’
‘कशाला?’
यात्रेला’
‘काय?’
‘हो’
‘अगं मी तुला काय सांगितलं होतं? वायफळ खर्च करू नको म्हणून. मग येवढे?’
‘आवो, वायफळ कुठं केलाय? सगळा बरोबर आहे. त्याचाच हिशेब करत होते. पायजे तर बघा.’
‘आता नको. सकाळी बघू. तू आता झोप.’
बरं.’ म्हणून तिने आपल्या माहेरच्या यात्रेला खर्च केलेल्या हिशेबाची गुंडळून ठेवली आणि अंथरूण तोंडावर घेतले. माझा लगेच डोळा लागला. कसातरी अर्धातास गेला असेल नसेल. बेडजवळच्या टेबलावरच्या मोबाईलची रिंग वाजली. दुसर्या रिंगला जागा झालो. बघतो तर कार्यालयातल्याच एका सहकार्याचा नंबर होता. मी उचलला.
’का ओ जेपी? बोला की?’
‘काही नाही पाटील सर, जेवला का?’
‘हो. झोपीपण गेलोय. बोला की?’
‘ते नव्हं तुमच्याकडे मांजर आहे का?’
‘हो आहे की? का?
‘मला घरात पायजे हुते.’
देतो. पण ते मोठे आहे. घरात राहणार नाही. पळून येणार.’
आवो, मांजराचे पिलू पाहिजे हुते. घरात उंदीर लय झाल्यात. सारखं खडबड खडबड करत्यात. त्यासाठी पाळायला पाहिजे.’
‘असं व्हयं. पण येवढ्यारात्री मी कुठलं आनू मांजराचं पिलू?’
‘आवो आत्ता नको उद्या द्या चालेल. ठेऊ का? गुड नाईट.’
‘हो. गुड नाईट. कुणाकडे असेल तर देतो हं.’
म्हणून मी मोबाईल बंद केला. आणि वळतोय तोच बायकोने धपका घातला. स्वत:ला सावरत मी मग रागानेच विचारले.
‘ का काय झाले?’
‘बाई बाई, ऑफीसला कामाला जाता का कुत्री-मांजरं पकडायला? सगळं घर जागं केलं. त्यो फोन तेवढा फोडा. नको आणा मीच स्विच ऑफ करते.’
मला बोलू न देता तिने फोन घेतला नी पूर्ण बंद केला.
मला कळेना, येर्हवी नेहमी वाघीण बनणारी आणि मला मांजर बनवणारी माझी बायको एवढी का चवताळलीय?
तेवढ्यात आईही जागी झाली. तिने विचारले.
कुणाचा फोन रं बाळं?’
‘नाही आई ऑफीसमधला होता. तू झोप’ म्हणून मी तिला समजावलं. तेवढ्यात बायको बोलली.
‘मी काय म्हणलो? आवो तुमच्या फोनने सगळं घर जागं झालेय. आमाला वाटलं वालूआई कडून दवाखान्यातनं फोन आला का काय? आजच वेळ काढून दवाखान्यातनं बघून आलोय. काळीज बघा कसं धडधडायला लागलंय. तुमाला काय कशाचा येळकाळ हाय?’
‘अगं, वालूआईला काय झालं?’
काय झालं काय? तुमची आज्जी काल दवाखान्यात अॅडमीट केलीया. तुमाला काय माहीत हाय का? जरा घरात बघत जावा. उठायचं नी ऑफीसला पळायचं? म्हणायचं आज लवकर बोलावलंय. कशाला कुणास ठाऊक? नाही नाही आता कळालं, कुत्री, मांजरं, उंदरं...’ मी हसायला लागलो तशी ती म्हणाली,
‘ हं हसताय काय, झोपा गप.’
मला आता कळालं. बायकांना वाघीण का म्हणतात ते! तशी हीही मार्जार कुळातलीच. त्यामुळे मीही मग गप झोपी गेलो.
- मारुती वि. पाटील

No comments:
Post a Comment